info@mycompany.io1-800-123-4567

  पर्यावरणातील ‘महात्मा’

  महात्मा गांधी हे २१ व्या शतकातील पर्यावरणतज्ज्ञ आहेत असे आपण म्हणू शकतो का? हिंसाचार आणि द्वेषाच्या वातावरणातून जाणार्या जगाला महात्मा गांधी रस्ता दाखवू शकतात. पर्यावरणाच्या संदर्भातील त्यांचे विचारच सांगतात, की आज जग ज्या पर्यावरणीय समस्यांतून मार्गक्रमण करीत आहे, त्या बहुतांश सर्व समस्यांचा त्यांनी तंतोतंत अंदाज लावला होता. गांधीजींच्या या विचारामुळेच प्रासंगिकता आणखी वाढते.

  अतिपाऊस, महापूर, वादळे, वणवे, यासारखी संकटे जगावर एकामागून एक आदळत आहेत. नैसर्गिक संकटांशी सामना करताना आता कोविड-१९ चे संकट उद्भवले आहे. कोविड-१९ ही हवामान बदलाची पुढील पायरी आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. हिमकडे वितळणे, पूरपरिस्थिती निर्माण होणे, जंगलांना वणवे लागणे किंवा लावले जाणे, समुद्राची पातळीही वाढणे ही लक्षणे कशाची आहेत? विकासाच्या मागे धावता धावता आपण विनाशाजवळ पोहोचलो आहोत. तो टाळण्यासाठी नैसर्गिक साधनांचा जास्तीत जास्त वापर करण्याचा महात्मा गांधी यांचा विचार अंगीकारण्याची गरज निर्माण झाली आहे.

  महात्मा गांधी या नावातच सगळे काही येते. दया, क्षमा, शांतता, करुणा ही गांधीजींची तत्वे आजही बहुमूल्य आहेत. विकास, पर्यावरणाबाबत महात्मा गांधी यांची स्पष्ट मते होती. साधे राहणीमान हा त्यांचा दागिनाच होता. नैसर्गिक साधनांचा जास्तीत जास्त वापर करणे त्यांच्या तत्वात बसत होते. निसर्गाची हानी करून कोणताही विकास त्यांना नको होता. महात्मा गांधी यांचा शाश्वत विकासावर विश्वास होता. पर्यावरणाच्या संरक्षणाबाबत त्यांची काही ठाम मते होती. निसर्गावर भार टाकणे त्यांना मान्य नव्हते. त्यामुळेच सध्याच्या परिस्थितीत त्यांचे विचार आजही तितकेच तंतोतंत लागू होतात.

  जागतिकीकरणाच्या रेट्यात विकासाच्या संकल्पना बदलल्या आहेत. पण आगामी काळात निसर्गाचे संरक्षण करून विकास साधणे हेच ध्येय ठेवणे आवश्यक आहे. या तत्वांवरच भारताकडून मार्गक्रमण सुरू आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात १३५ कोटी नागरिक कोविड विषाणूसोसह क्लायमा-३० शी लढा देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक व्यासपीठावरून याबाबत वेळोवेळी भारताचे धोरण स्पष्ट केले आहे.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ५ मार्च २०२१ रोजी केराविक ग्लोबल एनर्जी अँड एन्व्हायर्नमेंट लिडरशिप पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुलित्झर पुरस्कार विजेते डॉ. डॅनिएल येर्जिन यांच्या CERAWeek (Cambridge Energy Research Associates) संस्थेतर्फे आभासी पुरस्कार वितरण कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी भारताकडून हवामान बदलाबाबत केल्या जात अससेल्या प्रयत्नांना उजाळा दिला. पर्यावरणाची काळजी घेणार्या भारताच्या नागरिकांना तसेच भारताच्या वैभवशाली परंपरेला हा पुरस्कार समर्पित केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. भारताचे नागरिक निसर्गाची आणि पर्यावरणाची काळजी घेतात. भारतातील नागरिकांमध्ये अनेक शतकांपासून नेतृत्वगुण आहेत, असे पंतप्रधान मोदी सांगतात.

  महात्मा गांधी यांना जगातील महान पर्यावरणवादीही मानले जाते. त्यांच्या मार्गावर आपण चाललो असतो, तर आज समस्यांना सामोरे जावे लागण्याची वेळ आली नसती. महात्मा गांधीमध्ये विश्वासार्हता हा एक जबरदस्त गुण होता. त्यांनी सांगितल्याप्रमाणे नैसर्गिक स्त्रोतांचा जबाबदारीने वापर करणे आज क्रमप्राप्त आहे. महात्मा गांधी यांच्या शाश्वत ऊर्जेच्या तत्वाचा पंतप्रधानांनी उल्लेख करून सन २०३० पर्यंत कार्बन उत्सर्जन घटविण्यासाठीच्या प्रयत्नाची सविस्तर माहिती दिली आहे.

  शाश्वत ऊर्जा वापरण्यात भारत कुठे?

  पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात, की कार्बन उत्सर्जन घटविण्यासाठी भारताने अनेक प्रयत्न सुरू केले आहेत.

  • भारत २०३० पर्यंत नैसर्गिक वायूचा वापर ६ टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत वाढविणार आहे. देशात त्यावर काम सुरू आहे. इंधन म्हणून एलएनजीचा वापर केल्यास कार्बनचे उत्सर्जन निम्म्याने कमी होण्यास मदत होणार आहे. त्याचा वापर करण्यास प्रस्तावित करण्यात आले आहे. २) हायड्रेजनचा इंधनासाठी वापर करण्यासाठी राष्ट्रीय हायड्रोजन मिशन ही योजना कार्यान्वित केली आहे. ३) भारतात १ मार्च २०२१ पर्यंत ३७ दशलक्ष एलइडी बल्बचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे पैसा आणि ऊर्जा दोन्हीची बचत होणार आहे. दरवर्षी ३८ दशलक्ष टन कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन घटविले जाण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

  भारताने आतापर्यंत उत्कृष्ट पर्यावरणरक्षक म्हणूनच मार्गक्रमण केले आहे. संपूर्ण जग राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची स्तुती करते. परंतु कोणीही त्यांनी सांगितलेल्या करुणा, साधेपणा, नम्रता या तत्वांचे अनुकरण केलेले नाही. त्यामुळेच नॉट झीरो नेट झीरो साध्य करण्यासाठी महात्मा गांधी यांच्या शाश्वत विकासाच्या तत्वावर चालणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे.


  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *