info@mycompany.io1-800-123-4567

  कोविड-१९ चा लढा, क्लायमा-३०चे काय?

  • Home
  • Marathi Blogs
  • कोविड-१९ चा लढा, क्लायमा-३०चे काय?

  लीड –

  संपर्ण जगावरच कोविड-१९ ची मोठे संकट आलेले आहे. या संकटामुळे आपण सगळेच हादरलेलो आहोत. कोविडच्या नियमांचे पालन करून कोरोनाच्या संकटातून सावरूदेखील. पण २०३० मधील आणखी मोठे संकट आपल्याला कोणालाच दिसत नाही आहे. क्लायमा-३०. होय, हेच ते संकट आहे ज्याला आताच रोखले नाही, तर लोकांना सावरण्याची संधीच मिळणार नाही. क्लायमा-३० विरुद्ध लढण्यासाठी सर्वांची एकजूट खूपच आवश्यक आहे.

  २०१९ वर्ष सरता सरता कोणालाही पुढच्या संकटाची पुसटशी कल्पनादेखील आलेली नव्हती. एकमेकांची भेट घेणे सोडाच पण, आगामी काळात घरात कोंडून घेण्याची वेळ येणार आहे, याचा विचारही कोणाच्या ध्यानीमनी नव्हता. माणसाच्या बेदरकार वृत्तीवर कोरोना विषाणूने हा हल्ला केला होता. स्वतःला जगातील महासत्ता म्हणवणार्या देशानेसुद्धा कोरोनासमोर गुडघे टेकल्याचे प्रत्येकानेच पाहिले आहे. शंभर वर्षांपूर्वी महामारी आली होती. त्यानंतर वेगवेगळ्या देशांदरम्यानची युद्धे, महायुद्धे, प्रादेशिक वाद, दहशतवादी हल्ले अशा मानवनिर्मित संकटांनाही तोंड दिले. पण ही संकटे अचानक उद्भवलेली नव्हती. आताचे संकट पूर्णपणे वेगळे आहे. कोरोना विषाणूने अख्खे जगच विलगीकरणात आहे. यावर कोणताही ठोस इलाज सापडलेला नाही. कोरोना रोखण्यासाठी आपण शहरे, शाळा, हॉटेल, कारखाने बंद करत आहोत. सगळेच जण पॅनिक होऊ नका असे सांगत आहेत. पण लोकांच्या मनात भीती आहे. पण हे का झाले? कारण आपली आरोग्य यंत्रणा बळकट नव्हती म्हणून. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सगळेच संशोधक दिवस-रात्र एक करत आहेत.

  जगासमोरील पुढील संकट कदाचित यापेक्षाही मोठे असेल. ते कोणत्याही एका देशातून येणार नाही, ते चोहोबाजूने येईल. कोविड-१९ पेक्षा क्लायमा-३० हे संकट खूपच व्यापक आणि भीषण असेल. जगातील तज्ज्ञांनी या धोक्याबाबत आधीच इशारा देऊन ठेवलेला आहे. त्यातून सुटका करून घेण्यासाठी आजचे कोणतेच उपाय लागू पडणार नाहीत. प्रत्येकालाच त्याचे परिणाम भोगावे लागतील. पण घाबरायची नव्हे, तर सजग राहण्याची वेळ आहे. पर्यावरणाच्या संकटावर आपल्याकडे ठोस उपाययोजना हव्यात. नैसर्गिक साधनांचा जास्त वापर करण्याचा प्रयत्न करतो आहोत. हरितगृह वायू घटविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, पण ते तोकडे पडत आहेत. हवामान बदलाबाबत जागतिक पातळीवर म्हणा किंवा स्थानिक पातळीवर म्हणा. सगळेच जण पोटतिडकीने बोलत आहेत. पण यापुढे फक्त बोलून चालणार नाही. ठोस निर्णय घेऊन त्यावर अंमलबजावणी करण्याची गरज आहे. हवामान बदलामुळे निर्माण होणार्या संकटांनी यापूर्वीच संकेत दिलेले आहेत. आज ते गंभीर संकटाच्या रूपाने पुढे येत आहेत. ढगफुटी, वणवे, हिमकडे (ग्लेशियर) वितळणे, अनियमित पाऊस, पूरपरिस्थिती अशी संकटे एकामागून एक येत आहेत. आगामी काळात संकटांची तीव्रता वाढणार आहे. कोविड-१९ ने आपल्याला आरसा दाखविला आहे. त्यातून प्रत्येकानेच बोध घ्यायला हवा. त्यादृष्टीने उपाययोजना आखायला हव्यात. नाही तर विनाश अटळ आहे. कोविडचा सामना कसा करत आहोत यावरूनच जगाला क्लायमा-३० चा सामना कसा करायचा आहे हे कळेल. 

  वातावरणातील कार्बन उत्सर्जन घटविण्यासाठी इंटरगव्हर्ननमेंटल पॅनल ऑफ क्लायमेट चेंजने केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब गरजेचे आहे. कार्बन उत्सर्जनावर २०३० पर्यंत किमान ५० टक्के अंकुश लावणे गरजेचे आहे. तसे झाले तर २०५० सालापर्यंत १०० टक्के कार्बन तटस्थतेचे लक्ष्य साध्य करू शकतो. २०१६ साली पॅरिस येथे झालेल्या करारानुसार पृथ्वीचे तापमान दोन अंशांनी कमी करण्याचे जागतिक नेत्यांनी मान्य केले आहे. पण मधल्या काळात दुर्लक्ष झाल्यामुळे पृथ्वीचे तापमान एक अंशाने वाढले आहे. पृथ्वीचे तापमान आणखी दोन-चार अंशाने वाढले तर जगावर संकटांची मालिकाच सुरू होईल. अमेरिका, ब्राझील आणि रशियामध्ये तापमान वाढल्यामुळे जंगलांमध्ये वणवे पेटत आहेत. तर चीन, भारत आणि आशियाई देशांमध्ये ढगफुटीसारखा पाऊस कोसळून पूर येत आहेत. काही दिवसांनी समुद्राची पाणीपातळी वाढून मुंबई, शांघाय, न्यूयॉर्कसारख्या किनारी प्रदेशांमध्ये लोकांना हद्दपार व्हावे लागेल. विषुववृत्तीय भागातील वनांची सर्रास कत्तल होत आहे. ही वने पृथ्वीवरील सत्तर टक्के कार्बनडाय ऑक्साइड शोषून घेतात. त्याच वनांची कत्तल करून आपण आपल्या पायावर धोंडा मारून घेत आहोत. क्लायमा-३० म्हणजेच आपल्या हातात आणखी ९ वर्षे आहेत. २०३० पर्यंत मानवाचे अस्तित्व आहे. जगाने हे धोके आताच लक्षात घेणे गरजेचे आहे. पुढे वेळ निघून गेल्यावर रडत बसल्याशिवाय आपल्या हातात काहीच राहणार नाही. 

  Know more about CLIMA30 on

  http://rajendrashende.com/clima30/


  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *